
नवी दिल्ली, 10 एप्रिल (हिं.स.)। झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ आपल्या इतिहासात प्रथमच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. सर्व सामने कराची येथील नॅशनल बैंक स्टेडियमवर खेळवले जातील.
आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०२५-२९ चा भाग असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३ मे रोजी सुरू होईल. त्यानंतर १२ मे पासून टी-२० मालिका सुरू होईल.
पाकिस्तान महिला संघ सध्या महिला चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका १-२ ने गमावली आहे. दरम्यान, झिम्बाब्वे महिला संघ न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यामुळे सातव्या स्थानावर आहे. झिम्बाब्वे संघ २९ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये दाखल होईल आणि मालिकेची तयारी सुरू करेल.
वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
एकदिवसीय मालिका:
३ मे: पहिला एकदिवसीय सामना
६ मे: दुसरा एकदिवसीय सामना
९ मे: तिसरा एकदिवसीय सामना
टी२० मालिका:
१२ मे: पहिला टी२० सामना
१४ मे: दुसरा टी२० सामना
१५ मे: तिसरा टी२० सामना
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule