ठाणे - फायटर कप क्रिकेट स्पर्धा : पवन प्रसादची अष्टपैलू कामगिरी; शौर्य पुचालाचे शतक
ठाणे, 10 एप्रिल (हिं.स.)। भिवंडी येथे 16 वर्षांखालील मुलांची फायटर कप क्रिकेट स्पर्धा संपन्न होत असून ठाण्यातील लोकपुरम पब्लिक स्कूल संघाने स्पीड स्पोर्ट्स क्लबचा संघाला पराभूत करुन एकहाती विजय संपादन केला आहे. नाणेफेक जिंकून लोकपुरम पब्लिक स्कूलन
ठाणे


ठाणे, 10 एप्रिल (हिं.स.)। भिवंडी येथे 16 वर्षांखालील मुलांची फायटर कप क्रिकेट स्पर्धा संपन्न होत असून ठाण्यातील लोकपुरम पब्लिक स्कूल संघाने स्पीड स्पोर्ट्स क्लबचा संघाला पराभूत करुन एकहाती विजय संपादन केला आहे.

नाणेफेक जिंकून लोकपुरम पब्लिक स्कूलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शौर्य पुचाला आणि पवन प्रसाद यांच्यात 196 धावांची सलामीची भागीदारी झाली. लोकपुरम पब्लिक स्कूलने 40 षटकांत 6 गडी गमावून 292 धावा केल्या. फलंदाजीमध्ये शौर्य पुचालाने 98 चेंडूंत 103 धावा, पवन प्रसादने 96 चेंडूंत 57 धावा, रियान रावने 17 चेंडूंत 36 धावा, एम. जाधवने 19 चेंडूंत 26 धावा, हर्ष सोनारने 9 चेंडूंत 21 धावा केल्या.

स्पीड स्पोर्ट्स क्लबचा संघ 217 धावांवर सर्वबाद झाला. गोलंदाजीमध्ये विशाल प्रसादने 4 बळी, पवन प्रसादने 3 बळी, अमोघने 2 बळी घेतले. लोकपुरम पब्लिक स्कूलने 75 धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली.

बकुल अवराणी (विश्वस्त आणि प्रशासन), श्रीमती मंजुषा बापट (प्राचार्य), राहुल गिरी यांचे प्रशिक्षण आणि फिटनेस प्रशिक्षक राकेश यादव यांच्या मेहनतीमुळे संघाने हा विजय साकारला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande