
चुराचांदपूर, 11 एप्रिल (हिं.स.) : मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत चुराचांदपूर जिल्ह्यातून 2 जणांना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, सुमारे 1800 किलो अफू दाणा (पोप्पी सीड) आणि दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये एक मॉडिफाइड कार्बाइन आणि एक 9 एमएम पिस्तूल यांचा समावेश आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चंदेल जिल्ह्यातील जंगल परिसरात सुरक्षा दलांनी राबवलेल्या स्वतंत्र मोहिमेतही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एक एके-47 रायफल, चार देशी बनावटीच्या बंदुका, अनेक मॅगझिन, 7 मोर्टार, सुमारे 4 किलो आयईडी बनवण्याचे साहित्य आणि पाच वॉकी-टॉकी सेट जप्त करण्यात आले आहेत. सुरक्षा दलांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी