अमेरिका कतारमधील इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणार
तेहरान , 11 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी विविध करारांवर सध्या चर्चा सुरू आहे. अमेरिका, कतार आणि इतर परदेशी बँकांमध्ये गोठवून ठेवलेल्या इराणच्या मालमत्ता मुक्त करण्यास सहमती दर्शवली आहे. इराणी सूत्रांकडून आ
अमेरिका कतारमधील इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणार


तेहरान , 11 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी विविध करारांवर सध्या चर्चा सुरू आहे. अमेरिका, कतार आणि इतर परदेशी बँकांमध्ये गोठवून ठेवलेल्या इराणच्या मालमत्ता मुक्त करण्यास सहमती दर्शवली आहे. इराणी सूत्रांकडून आज, शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा हा निर्णय होर्मुज सामुद्रधुनीत सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्याशी थेट संबंधित आहे.

अहवालानुसार, एका वरिष्ठ इराणी सूत्राने शनिवारी सांगितले की, अमेरिका कतार आणि इतर परदेशी बँकांमध्ये गोठवून ठेवलेल्या इराणच्या मालमत्ता मुक्त करण्यास सहमत झाली आहे. सूत्राने या पावलाचे स्वागत करत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हे अमेरिका-इराण चर्चेत प्रगती करण्याच्या दृष्टीने गंभीरतेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, इराणच्या मालमत्ता अनफ्रीज करण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेने अद्याप कोणतीही अधिकृत सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande