नांदेड - लक्ष्मीकांत तांबोळी यांना समता गौरव पुरस्कार
नांदेड, 15 एप्रिल, (हिं.स.) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मागील २४ वर्षापासून दिले जाणारे पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष बापूराव गजभारे, सचिव आनंद गजभारे यांनी जाहीर केली. यंदाचा समता गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीक
नांदेड - लक्ष्मीकांत तांबोळी यांना समता गौरव पुरस्कार


नांदेड, 15 एप्रिल, (हिं.स.) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मागील २४ वर्षापासून दिले जाणारे पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष बापूराव गजभारे, सचिव आनंद गजभारे यांनी जाहीर केली. यंदाचा समता गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत तांबोळी यांना जाहीर झाला. तर पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार पुण्याचे मिकी घई यांना देण्यात येणार आहे. रोख २५ हजार रुपये, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

जिल्हास्तरीय पुरस्कारात मुक्तेश्वर पाटील, डॉ. मनोज गीमेकर यांना पत्रकारिता, छायाचित्र पुरस्कार विजय होकणें यांना जाहीर झाला. रोख १० हजार रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्मृतीशेष मनोज गजभारे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी युपीएससी उत्तीर्ण अतुल अनिल राजुरकर यांना देण्यात येणार आहे.

पुढील वर्षी २०२७मध्ये पुरस्कार उपक्रमाला २५ वर्ष पूर्ण होणार असून मागील २५ वर्षांत ज्या ज्या मान्यवरांना गौरविण्यात आले, त्यांना गौरव मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या सर्वांचा जीवनपट स्मरणिकेच्या माध्यमातून जनतेसमोर आणले जाणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande