अमरावती लैंगिक शोषण प्रकरण : ‘पहिल्या ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनल्याचा आरोपीचा दावा
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : अमरावतीतील तरुणींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणाने राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आली
'पहिलं ब्रेकअप अन् तो 'प्लेबॉय' बनला;


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : अमरावतीतील तरुणींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणाने राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आली आहे.

“पहिल्या ब्रेकअपमुळे मी ‘प्लेबॉय’ बनलो,” असे वक्तव्य अयान अहमद याने चौकशीदरम्यान केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या मते हे प्रकरण कोणत्याही मानसिक आजाराचे नसून किशोरवयीन मानसिकता, सोशल मीडियाचा गैरवापर आणि भडक जीवनशैलीतून घडलेला गंभीर गुन्हा आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर अत्यंत सक्रिय होता. त्याचे १८ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते आणि तो इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून पेड जाहिरातींमधून उत्पन्न मिळवत होता. यासोबतच तो मोबाईल विक्रीचा व्यवसायही करत होता.

तथापि, त्याच्या भपकेबाज जीवनशैलीसाठी आणि खर्चासाठी तो मित्र तसेच कुटुंबीयांकडून पैसे उसने घेत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावरील आकर्षक प्रतिमेचा वापर करून तो तरुणींना संपर्क साधत असल्याचा आरोप आहे.

तपासानुसार, आरोपी सुरुवातीला तरुणींशी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करत असे. त्यानंतर काही महिन्यांनी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करून त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे आणि लैंगिक शोषण करत असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणामुळे सोशल मीडियाचा गैरवापर, तरुणींवरील ऑनलाइन शोषण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. पोलिस पुढील तपास करत असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande