परभणी - दर्गा रोड प्राथमिक आरोग्य केंद्राची महापौर इकबाल यांची पाहणी
परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)। परभणी शहरातील दर्गा रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नूतन महापौर सय्यद इकबाल यांनी अचानक भेट देत पाहणी केली. त्यांच्या या भेटीमुळे आरोग्य केंद्रातील कामकाजाची प्रत्यक्ष स्थिती समोर आली. यावेळी नगरसेवक मुशु खान, नगरस
अ


परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)। परभणी शहरातील दर्गा रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नूतन महापौर सय्यद इकबाल यांनी अचानक भेट देत पाहणी केली. त्यांच्या या भेटीमुळे आरोग्य केंद्रातील कामकाजाची प्रत्यक्ष स्थिती समोर आली.

यावेळी नगरसेवक मुशु खान, नगरसेवक नईमभाई, नगरसेवक अब्रार इलाही, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, डॉ. सना खान तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान महापौरांनी आरोग्य केंद्रातील औषध साठा, त्याचा वापर व उपलब्ध सुविधा यांची सविस्तर तपासणी केली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून ओळख परेड घेत त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना महापौर सय्यद इकबाल म्हणाले की, नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आरोग्य केंद्रास लागणाऱ्या आवश्यक साहित्याची मागणी तात्काळ करावी, ती भांडार विभागामार्फत त्वरीत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच प्रलंबित समस्या त्वरित सोडविण्याचे आदेश संबंधितांना दिले. गरीब व गरजू नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande