परभणीत ‘भाई अण्णासाहेब गव्हाणे’ स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन
परभणी, 17 एप्रिल, (हिं.स.)। मराठवाडा केसरी कै. भाई अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार 18 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात ‘भाई अण्णासाहेब गव्हाणे स्मृती व्याख्यानमाले’चे आयोजन करण्
परभणीत ‘भाई अण्णासाहेब गव्हाणे’ स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन


परभणी, 17 एप्रिल, (हिं.स.)। मराठवाडा केसरी कै. भाई अण्णासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार 18 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात ‘भाई अण्णासाहेब गव्हाणे स्मृती व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले असून या व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध कवी व लेखक प्रा. इंद्रजीत भालेराव ‘शोध शेती संस्कृतीचा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अशोक सोनी यांच्यासह माजी आमदार अॅड.विजयराव गव्हाणे, दादासाहेब देशमुख, दादासाहेब नाईकवाडे, कैलासराव गव्हाणे, गजानन लव्हाळे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी डॉ. भीमराव हत्तीअंबिरे यांना प्राप्त झालेल्या ‘भीमरत्न’ पुरस्कारानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कथाकार राजेंद्र गहाळ लिखित ‘कोंडी’, ‘दोन एकर’ आणि ‘पोशिंदा’ या कथासंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवानेते अजयराव गव्हाणे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष कथाकार राजेंद्र गहाळ, उपाध्यक्ष विलास चट्टे, सचिव रमेश नाईकवाडे, सहसचिव सौ. गीतांजलीताई गव्हाणे, कोषाध्यक्ष लखनसिंह जाधव, संचालक मंडळ सदस्य व इतर पदाधिकार्यांनी केले आहे.

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लढवय्ये नेते कै. भाई अण्णासाहेब गव्हाणे यांच्या जीवनकार्याचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande