खोपोलीत घरफोडी; १.४७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
रायगड, 17 एप्रिल (हिं.स.)। खोपोली शहरातील पाटणकर चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल १ लाख ४७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना 13 एप
House burglary in Khopoli; Gold ornaments worth 1.47 lakhs looted


रायगड, 17 एप्रिल (हिं.स.)। खोपोली शहरातील पाटणकर चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल १ लाख ४७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना 13 एप्रिल 2026 रोजी रात्री 11.30 वाजल्यापासूनच्या दरम्यान घडली असावी अशी . मिळालेल्या माहितीनुसार, एम.झेड. अपार्टमेंट, पाटणकर चौक, खोपोली (ता. खालापूर) येथील एका फ्लॅटमध्ये अज्ञात आरोपींनी प्रवेश केला.

चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून त्यामधील सुमारे १,४७,००० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 135/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305(a) व 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करीत असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande