
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आलेले कुशाल जैन यांनी दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतला. पहिल्याच भेटीत ते पत्रकारांना आपलेसे वाटून गेले.प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले.गुरुवारी जिल्हा परिषदेत सदस्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चार्ज घेतल्यानंतर जैन यांनी कार्यशाळा जॉइन केली.ही कार्यशाळा संपल्या नंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापतींनी नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार केला. त्यानंतर प्रत्येक सदस्यांनी त्यांचे स्वागत करत फोटो काढले, प्रत्येकांना स्माईल देत ते फोटोला सामोरे गेले. काही सदस्य महिलांची मुलं आली होती. त्यांना जवळ बोलावून त्यांनी फोटो काढले. पहिल्याच भेटीत झेडपी सीइओ कुशाल प्रत्येकाना आपलेसे वाटल्याचे पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड