अकोला : महापालिका झाली सत्ताधाऱ्यांचा आखाडा
अकोला, 17 एप्रिल (हिं.स.)। यावर्षी राज्यातील महापालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर अकोला महापालिकेत भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची सत्ता आली आहे.. मात्र सत्तेची गणितं जुळविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता विकासाचा विसर पडला की काय अशी परिस्थिती सध्या अकोला महाप
अकोला : महापालिका झाली सत्ताधाऱ्यांचा आखाडा


अकोला, 17 एप्रिल (हिं.स.)। यावर्षी राज्यातील महापालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर अकोला महापालिकेत भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची सत्ता आली आहे.. मात्र सत्तेची गणितं जुळविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता विकासाचा विसर पडला की काय अशी परिस्थिती सध्या अकोला महापालिकेत होत असलेल्या सत्ताधाऱ्यांमधील वादामुळे निर्माण झाली आहे.. निवडून दिलेले पदाधिकारी हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले की आपसात भांडणे करण्यासाठी असा सवाल आता अकोल्यातील सामान्य जनता विचारू लागली आहे..

राज्यात महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या.. निकालानंतर राज्यातील अकोला महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या.. तर शहर सुधार आघाडीच्या नावाने शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार यांना सोबत घेत सत्ता स्थापन केली.. महापालिकेच्या कामकाजाला सुरुवात ही झाली.. सर्वसाधारण आणि स्थायी समितीच्या सभेत जनतेचे प्रश्न मांडण्यात येत आहेत... मात्र गेल्या दोन तीन सभापासून अकोल्यातील महापालिकेच्या सभा वादग्रस्त व्हायला लागल्या आहेत.. तीन दिवसापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत तर मोठा कहर झाला.. या सभेत सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे दोन प्रमुख पदाधिकारी चांगलेच भिडले.. लाईव्ह सभा सुरू असताना हे पदाधिकारी एकमेकांना महिला नगरसेवकांसमोर शिवीगाळ आणि अक्षरशः एकमेकांच्या अंगावर जाईपर्यंत झालेला प्रकार संपूर्ण अकोलेकरांनी पाहला.. अनेकांनी आपल्या सोशल मिडियावर या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.. हे नगरसेवक जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी एकमेकांना शिवीगाळ आणि अंगावर जायला लागले आहेत.. हा प्रकार येथेच थांबला नाही तर दुसऱ्याही दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर भारुका हे आपल्या समर्थकांसह महापालिका परिसरात आले.. त्यांनी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांना अरेरावी करण्यास सुरुवात केली.. त्यांच्या सोबत वाद घालण्याचा प्रयत्नही केला.. यावेळी दोघांमधला वाद एकामेकांच्या अंगावर जाईपर्यंत आणि हाच वाद पोलिस ठाण्यात गेला.. विजय अग्रवाल यांच्या तक्रारीवरून भारुका यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. प्रश्न वादाचा नाही मात्र यामुळे सामन्य जनतेच्या मनात मोठा नाराजीचा सूर आहे...

सत्तेतील दोन्ही पदाधिकारी यांच्या वादामुळे अकोल्यात वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत.. एकीकडे उन्हाचा पारा वाढतोय तर दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.. दरम्यान यावर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी यावर बोलतांना मात्र झालेला हा प्रकार चुकीचाच असून आमच्या पदाधिकारी यांचं कसं बरोबर आहे.. हे पटवून सांगितलं..

सामान्य अकोलेकरांनी आपले सेवक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत पाठवले..मात्र हेच नगरसेवक आता वेगळा रंग दाखवायला लागले आहेत.. विकासाचे प्रश्न सोडून भांडणाऱ्या नगरसेवकांना आता तरी वाद न करता जनतेसाठी कामे करावीत हीच सामान्य अकोलेकरांची अपेक्षा...

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande