डोंबिवली - कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियनने पाठविले आयुक्तांना पत्र
डोंबिवली, 17 एप्रिल, (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महागगरपालिका प्रशासनाने भारताचे संविधान व पथविक्रेता कायदा - 2014 मधील तरतुदींचे निरंतर उल्लंघन करून पथविक्रेत्यांना आत्महत्या करणे भाग पाडण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा गंभीर गुन्हा असल्याची नों
डोंबिवली - कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियनने पाठविले आयुक्तांना पत्र


डोंबिवली, 17 एप्रिल, (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महागगरपालिका प्रशासनाने भारताचे संविधान व पथविक्रेता कायदा - 2014 मधील तरतुदींचे निरंतर उल्लंघन करून पथविक्रेत्यांना आत्महत्या करणे भाग पाडण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा गंभीर गुन्हा असल्याची नोंद घ्यावी अशा विषयाचे पत्र पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियन डोंबिवली माध्यमातून नुतन रणदिवे, आशा मगर, बबनराव कांबळे, अभय दुबे, नईम खान, भालचंद्र पाटील यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.

युनियन तर्फे आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या तीस दिवसांपेक्षा अधिक काळापासून डोंबिवलीतील सुमारे एक हजार फेरीवाल्यांविरूद्ध पालिका प्रशासनाने निरंतर कंठोर कारवाई करून त्यांचे व त्यांच्या कुटूंबियांचे जीवन धोक्यात आणले आहे. भारताच्या संविधानातील तरतुदींच्या विपरीत आणि फेरीवाला कायदा-2014 चे उल्लंघन सतत होत आहे. कायद्यानुसार पुनर्वसन करण्याचे घटनात्मक कर्तव्य पार न पाडता, फेरिवाल्यांविरूद्ध कारवाई होत आहे. फेरीवाल्यांचा माल जप्त करण्याची कारवाई कायद्यानुसार केली जात नाही. कारवाईसाठी नेमलेले भाडोत्री गुंड फेरीवाल्यांच्या मालाची लूट करतात. जप्त केलेला माल परत मिळत नाही.

अशा कारवाईमुळे हातावर पोट भरणाऱ्या फेरीवाल्यांचे व्यवसायासाठी असलेले तुटपुंजे भांडवल संपुष्टात येऊन, आवश्यक भांडवलासाठी

कसाई वृत्तीच्या खाजगी सावकारांच्या आश्रयाला जाणे भाग पडत आहे. या कारवाईमुळे संबंधित फेरीवाल्यांना आत्महत्येच्या मार्गावर ढकलण्याचे

घोर पातक होत आहे याची गंभीर नोंद घ्यावी.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande