सोलापूर महापालिकेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
सोलापूर, 19 एप्रिल, (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार
Hff


सोलापूर, 19 एप्रिल, (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या महानगरपालिकेच्या वाहनांचे पूजन महापौर विनायक कोंड्याल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृहनेते नरेंद्र काळे, पृथ्वीराज कोंड्यात, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मुख्य लेखापरीक्षक रत्नराज जवळेकर, नगर अभियंता सारिका आकुलवार, महेश देवकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये राजाभाऊ सरवदे, आनंद चंदनशिवे, राजाभाऊ इंगळे, मिलिंद प्रेक्षाळे, सुबोध वाघमोडे, लौकिक इंगळे, विनीत गायकवाड, सुशील सरवदे, दशरथ कसबे, पिंटू डावरे, विकी शेंडगे, राहुल शंके, प्रवीण निकाळजे, राजरत्न फडतरे, शिवम सोनकांबळे, विनोद वाघमारे, बबन शिंदे, सुग्रीव जेटीथोर आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande