राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता
नांदेड, 19 एप्रिल (हिं.स.)। राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात यादरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसा
राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता


नांदेड, 19 एप्रिल (हिं.स.)।

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात यादरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होऊ शकते.

पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाची व्याप्ती वाढण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. तथापि, २२ तारखेला वादळी पावसाची व्याप्ती आणि त्याचा प्रभाव कमी होईल.

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत.

काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्री/झाकणाने सुरक्षित ठेवावीत.

वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेली उत्पादने उघड्यावर ठेवू नयेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande