राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल; 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, 2 एप्रिल (हिं.स.) : राज्य सरकारकडून गुरुवारी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला असून, एकाचवेळी राज्यातील तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यां
महाराष्ट्र मंत्रालय लोगो


मुंबई, 2 एप्रिल (हिं.स.) : राज्य सरकारकडून गुरुवारी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला असून, एकाचवेळी राज्यातील तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.

राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका दोन दिवसांपूर्वीच सुरू झाला होता. त्यावेळी 10 ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आजच्या नव्या आदेशात आणखी 25 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

महत्वाच्या बदल्या पुढीलप्रमाणे :

1. विनय गौडा – जिल्हाधिकारी चंद्रपूर → जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर

2. डॉ. प्रविणकुमार देवरे – आयुक्त पशुसंवर्धन, पुणे → जिल्हाधिकारी बुलढाणा

3. डॉ. किरण पाटील – जिल्हाधिकारी बुलढाणा → आयुक्त पशुसंवर्धन, पुणे

4. दीपक सिंगला – अतिरिक्त आयुक्त पीएमआरडीए, पुणे → मनरेगा आयुक्त, नागपूर

5. डॉ. भारत बस्तेवाड – आयुक्त मनरेगा, नागपूर → जिल्हाधिकारी लातूर

6. डॉ. विजय राठोड – जॉइंट सीईओ, एमआयडीसी, मुंबई → जिल्हाधिकारी कोल्हापूर

7. डॉ. मंगेश गोंदवले – एमडी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, मुंबई → जिल्हाधिकारी गोंदिया

8. प्राजी नायर – जिल्हाधिकारी गोंदिया → एएमसी, पुणे महानगरपालिका

9. वर्षा ठाकूर-घुगे – जिल्हाधिकारी लातूर → संयुक्त सीईओ, एमआयडीसी, मुंबई

10. जी श्रीकांत – एमसी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका → मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई

11. अमोल येडगे – जिल्हाधिकारी कोल्हापूर → एमसी, छत्रपती संभाजीनगर महापालिका

12. अंकित – सीईओ, झेडपी छत्रपती संभाजीनगर → एएमसी, नागपूर महापालिका

13. वसुमना पंत – एएमसी, नागपूर महानगरपालिका → जिल्हाधिकारी चंद्रपूर

14. दिलीप स्वामी – जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर → एमडी, एमएस सीड्स कॉर्पोरेशन, अकोला

15. अंजली शर्मा – एमसी, जालना महानगरपालिका (नियुक्ती)

16. मिन्नू – सीईओ, झेडपी जालना → सीईओ, झेडपी छत्रपती संभाजीनगर

17. कृष्णकांत कंवरिया – सहाय्यक आयुक्त, शहादा (नंदुरबार) → सीईओ, जि.प. जालना

18. वर्षा लड्डा – महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद, पुणे → एमसी, अमरावती महापालिका

19. के. मंजुलक्ष्मी – एमसी, कोल्हापूर महानगरपालिका → अतिरिक्त आयुक्त पीएमआरडीए, पुणे

20. डॉ. राजेंद्र भारुड – प्रकल्प संचालक, रुसा, मुंबई → एमसी, कोल्हापूर महानगरपालिका

21. सत्यम गांधी – एमसी, सांगली-मिरज महानगरपालिका → सीईओ, झेडपी अमरावती

22. संजीता महापात्रा – सीईओ, झेडपी अमरावती → एमसी, सांगली-मिरज महापालिका

23. डॉ. जास्मिन – सहाय्यक महाविद्यालय, राजापूर (रत्नागिरी) → सीईओ, झेडपी कोल्हापूर

24. कार्तिकेयन एस – सीईओ, झेडपी कोल्हापूर → जिल्हाधिकारी सोलापूर

25. कुमार आशीर्वाद – जिल्हाधिकारी सोलापूर → जिल्हाधिकारी नागपूर

या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासनिक रचनेत महत्त्वपूर्ण बदल होणार असून विविध जिल्ह्यांमध्ये नव्या नेतृत्वाची नियुक्ती झाली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक प्रशासन अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande