नागपूर : नरखेड तालुक्यात रोखला बालविवाह
नागपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामधील मालापुर येथे धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह केला जात होता. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा विवाह तब्बल 35 वर्षीय पुरुषासोबत होणार होता, मात्र प
बाल विवाह प्रतिकात्मक छायाचित्र


नागपूर, 02 एप्रिल (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामधील मालापुर येथे धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह केला जात होता. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा विवाह तब्बल 35 वर्षीय पुरुषासोबत होणार होता, मात्र प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विवाह थांबवला आणि मुलीची सुटका केली.

सदर बाल विवाहाबाबत बाल संरक्षण कक्षाकडे तक्रार मिळताच कोंढाळी पोलिस घटनास्थळी पोहचले. तसेच अल्पवयीन मुलीची सुटका केली आणि नरखेड पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली हा बालविवाह लपवून पार पाडण्याचा प्रयत्न होत होता, पण प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या कारवाईत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, पोलीस निरीक्षक मंगला मोकाशी, जिल्हा बाल रक्षक समन्वयक प्रसेनजीत गायकवाड आणि चाइल्ड लाईन प्रतिनिधी मीनाक्षी धडाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुटका झालेल्या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिला पुढील संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात येणार आहे. तिच्या पुनर्वसनाचा निर्णय बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आला आहे.

या प्रकरणात बालविवाह प्रतिबंध अधिनियम तसेच पोस्को कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा विवाहाला पाठिंबा देणाऱ्या आयोजकांवर आणि उपस्थितांवरही कठोर कारवाई होऊ शकते.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande