आयपीएलमध्ये खेळण्यासाठी श्रीलंकेच्या नुवान थुशाराची न्यायालयात धाव
कोलंबो, 02 एप्रिल (हिं.स.)श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान थुशाराने चालू आयपीएल हंगामात खेळण्यासाठी स्वतःच्याच क्रिकेट बोर्डाला आव्हान दिले आहे. त्याने ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी विनंती केली. फिट
नुवान थुशारा


कोलंबो, 02 एप्रिल (हिं.स.)श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान थुशाराने चालू आयपीएल हंगामात खेळण्यासाठी स्वतःच्याच क्रिकेट बोर्डाला आव्हान दिले आहे. त्याने ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करावा अशी विनंती केली. फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने थुशाराला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास नकार दिला होता.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने खरेदी केलेल्या थुशाराने श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) कडून एनओसी जारी करण्याचा आदेश मिळावा यासाठी कोलंबो जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

२०२२ पासून आपल्या देशासाठी ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या या क्रिकेटपटूने असा युक्तिवाद केला आहे की, एसएलसीसोबतचा त्याचा करार ३१ मार्च रोजी संपला असून त्याला तो वाढवण्याची इच्छा नाही. थुशाराने सांगितले की, त्याने आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याच्या इच्छेबद्दल एसएलसीला कळवले होते. त्याने म्हटले की, अशा परिस्थितीत, फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) न देण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द करावा.

राष्ट्रीय संघात निवडीसाठी एसएलसीने फिटनेस चाचणी अनिवार्य केली आहे. थुशारा म्हणाला की, त्याची फिटनेस पातळी कधीही कमी आढळली नाही आणि पूर्वीही एसएलसीने त्याला अशाच फिटनेस पातळीवर खेळण्याची परवानगी दिली होती. २०२५ मध्ये आरसीबीने तुषारला १.६ कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या हंगामात तो संघासाठी एक सामना खेळला होता. या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत १३७ टी-२० सामन्यांमध्ये २१.२५ च्या सरासरीने १७४ विकेट्स घेतल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande