ऑस्ट्रेलियाचा संघ १२ वर्षांनंतर झिम्बाब्वेचा दौरा करणार
नवी दिल्ली, 02 एप्रिल (हिं.स.)ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. २०१४ नंतर ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेचा हा पहिला एकदिवसीय दौरा आहे. अलीकडच्या काळात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियन संघांसमोर सातत
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ


नवी दिल्ली, 02 एप्रिल (हिं.स.)ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. २०१४ नंतर ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेचा हा पहिला एकदिवसीय दौरा आहे. अलीकडच्या काळात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियन संघांसमोर सातत्याने एक मोठे आव्हान उभे केले आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्यात झिम्बाब्वेने मोठी भूमिका बजावली होती.

झिम्बाब्वेकडून २३ धावांनी पराभव झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाला गट फेरीतून मानहानीकारकपणे बाहेर पडावे लागले होते. टी-20 विश्वचशकाच्या गट फेरीत झिम्बाब्वे अपराजित राहिला होता. त्यांनी सह-यजमान श्रीलंका, आयर्लंड आणि ओमान, तसेच ऑस्ट्रेलियाला पराभूत करून व्हाईट-बॉल क्रिकेटमधील आपले स्थान पुन्हा एकदा मजबूत केले होते.

झिम्बाब्वे मालिकेमुळे ऑस्ट्रेलियाच्या व्यस्त वेळापत्रकात आणखी भर पडली आहे. जूनमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये व्हाईट-बॉल सामने नियोजित आहेत, आणि ऑगस्टमध्ये मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने होणार आहेत. झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलिया त्यांच्याविरुद्धच तीन कसोटी सामने खेळणार आहे. २०१८ च्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेतील ही ऑस्ट्रेलियाची पहिली कसोटी मालिका असणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वे दौरा

पहिला एकदिवसीय सामना: १५ सप्टेंबर, हरारे

दुसरा एकदिवसीय सामना: १८ सप्टेंबर, हरारे

तिसरा एकदिवसीय सामना: २० सप्टेंबर, हरारे

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande