परभणी - ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक कोल्हे यांची नियुक्ती
परभणी, 20 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) अध्यक्षपदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली असून, परभणी व नांदेड परिक्षेत्रासाठी सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांची अध्यक्
परभणी - ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक कोल्हे यांची नियुक्ती


परभणी, 20 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) अध्यक्षपदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली असून, परभणी व नांदेड परिक्षेत्रासाठी सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महावितरण (MSEDCL) मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात आले आहेत. वीजपुरवठा संदर्भात ग्राहक तसेच औद्योगिक घटकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी या मंचाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. प्राप्त तक्रारींवर सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय देण्याची जबाबदारी या मंचावर सोपविण्यात आली आहे. ग्राहकांनी CGRF, MSEDCL च्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविल्यास त्याची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. डॉ. अशोक कोल्हे यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande