मुलांच्या पगारातून दहा हजार रुपये आई-वडिलांच्या खात्यावर वर्ग करण्याचा कायदा : मंत्री मुश्रीफ
कोल्हापूर, 20 एप्रिल (हिं.स.)। अलीकडच्या काळात आई-वडिलांची सेवा केली पाहिजे हेच मुले विसरून गेली आहेत. लाख- दोन लाख पगार घेणारी मुलेसुद्धा आई-वडिलांना बघत नाहीत, याची तक्रार केल्यास मुलांच्या पगारातून दहा हजार रुपये आई-वडिलांच्या खात्यावर वर्ग करण
ना. हसन मुश्रीफ


कोल्हापूर, 20 एप्रिल (हिं.स.)।

अलीकडच्या काळात आई-वडिलांची सेवा केली पाहिजे हेच मुले विसरून गेली आहेत. लाख- दोन लाख पगार घेणारी मुलेसुद्धा आई-वडिलांना बघत नाहीत, याची तक्रार केल्यास मुलांच्या पगारातून दहा हजार रुपये आई-वडिलांच्या खात्यावर वर्ग करण्याचा कायदा केल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल येथील एका कार्यक्रमात दिली.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले अशी अनेक उदाहरणे आहेत. आई-वडील काय खातात, पितात हेसुद्धा बघत नाहीत. यासाठी मी एक कायदा केलेला आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनामध्ये जाऊन मुले काळजी घेत नसलेल्या साठ वर्षावरील आई-वडिलांनी जाऊन लेखी तक्रार करायची. अशा मुलांच्या पगारातून दहा हजार रुपये आई-वडिलांच्या खात्यावर वर्ग होतात. त्याशिवाय मुलानाही अक्कल येणार नाही. समाजानेही यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.

कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande