होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय खलाशांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य- जयस्वाल
नवी दिल्ली , 20 एप्रिल (हिं.स.)।खाडी क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ऊर्जा पुरवठा, सागरी सुरक्षा आणि भारतीय नागरिकांच्या मदतीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने सांगितले की देशातील घरगुती गॅस पुरवठा, बंदरगाहांचे काम
होर्मुजमध्ये अडकलेल्या भारतीय खलाशांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य- जयस्वाल


नवी दिल्ली , 20 एप्रिल (हिं.स.)।खाडी क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ऊर्जा पुरवठा, सागरी सुरक्षा आणि भारतीय नागरिकांच्या मदतीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने सांगितले की देशातील घरगुती गॅस पुरवठा, बंदरगाहांचे कामकाज आणि आवश्यक सेवा सुरळीत सुरू आहेत, तर परराष्ट्र मंत्रालय भारतीय नागरिक आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या निर्देशानुसार खाडी देशांसोबत भारताचा सक्रिय संवाद सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी १९ एप्रिल रोजी सौदी अरेबियाचा अधिकृत दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऊर्जा मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि समकक्ष अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक परिस्थिती आणि परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

जयस्वाल म्हणाले की, भारत इराणसह इतर देशांच्या संपर्कात आहे, जेणेकरून होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करता येईल. शनिवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच भारताने हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित केला. त्यांनी सांगितले की भारतीय बाजूने इराणच्या राजदूतांना पाचारण करण्यात आले आणि परराष्ट्र सचिव स्तरावर बैठक घेऊन तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. भारताने स्पष्टपणे सांगितले की भारतीय खलाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे आणि सागरी मार्गांवरील वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिली पाहिजे. जयस्वाल यांच्या मते, इराणी राजदूतांनी भारताच्या चिंता तेहरानमधील संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील, असे आश्वासन दिले. भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी सातत्याने संपर्क सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव (गल्फ) असीम महाजन यांनी सांगितले की, या प्रदेशातील भारतीय दूतावास आणि बंदरगाहांकडून २४ तास हेल्पलाइन सुरू ठेवण्यात आली आहे. उड्डाणे, प्रवास व्यवस्था, वाणिज्य दूतावास सेवा आणि भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी सातत्याने काम सुरू आहे. ते म्हणाले की, या भागातील भारतीय खलाशांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य आहे. गल्फ एअरने बहरीन आणि भारतादरम्यान मर्यादित उड्डाण सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत २,४२३ भारतीय नागरिकांना इराण आणि अझरबैजानमधून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच जॉर्डन आणि इजिप्तमधून भारतीय नागरिकांच्या भारतात परतीची व्यवस्था सुलभ करण्यात आली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातील संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, देशातील घरगुती एलपीजी पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे आणि कुठेही गॅस संपल्यासारखी परिस्थिती नाही. त्या म्हणाल्या की, व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला होता, मात्र आता तो ७० टक्क्यांपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. नैसर्गिक वायूचा १०० टक्के पुरवठा सुनिश्चित करण्यात आला असून, घरगुती गरजा आणि सार्वजनिक वाहतूक यांना प्राधान्य देण्यात आले आहे.ज्या राज्यांनी पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) नेटवर्क विस्तारात सहकार्य केले आहे, त्यांना १० टक्के अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी देण्यात येत आहे. सध्या २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अतिरिक्त एलपीजी पुरवठा केला जात आहे.

बंदरगाह, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे संचालक मंदीप सिंह रंधावा यांनी सांगितले की, गेल्या ४८ तासांत होर्मुझमधून जात असताना भारताच्या दोन जहाजांवर गोळीबार झाला.त्यानंतर दोन्ही जहाजे परत फारसच्या आखातात वळवण्यात आली. मात्र चालक दलातील कोणालाही दुखापत झाली नाही. ते म्हणाले की मंत्रालय परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. महासंचालक शिपिंगमार्फत आतापर्यंत २,५६३ भारतीय खलाशांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी गेल्या २४ तासांत २५ खलाशी परतले आहेत. देशभरातील बंदरगाहांवरील कामकाज सुरळीत असून कुठेही गर्दीची स्थिती नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande