
रायगड, 20 एप्रिल (हिं.स.)। : कुशिवली येथील युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीमध्ये उद्योग संचालनालयामार्फत विभागीय अधिकारी व महाव्यवस्थापक यांची नुकताच तीन दिवसीय राज्यस्तरीय परिषद उत्साहात पार पडली.
या परिषदेस राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह (भाप्रसे), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) वैभव वाघमारे (भाप्रसे), अतिरिक्त उद्योग संचालक बाळासाहेब यशवंते यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व विभागीय उद्योग सहसंचालक आणि जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळया उपस्थित होते.
उद्योग संचालनालयामार्फत राज्यात उद्योगवाढ व स्वयंरोजगारासाठी विविध महत्त्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण-2025 जाहीर करण्यात आले आहे.
परिषदेदरम्यान औद्योगिक गुंतवणूक, सेवा उद्योग धोरण-2025, माहिती तंत्रज्ञान धोरण, व्यवसाय सुलभता (EODB) आणि ‘मैत्री’ या विषयांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले. तसेच, उद्योग विभागातील अधिकाऱ्यांसाठी प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा प्रभावी वापर कसा करता येईल याविषयी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)