बीड - धारूर शहर व तालुक्यात २२१ कर्मचाऱ्यांवर जनगणनेची जबाबदारी
बीड, 21 एप्रिल (हिं.स.)। जनगणना प्रक्रियेसाठी शहर व ग्रामीण भागात मिळून एकूण २२१ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून, या कामासाठी तालुक्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक जनगणनेस १४ मेपासून सुरुवात होणार आहे. धारूर शहरात २६ प्रगणक तर ग्रा
बीड - धारूर शहर व तालुक्यात २२१ कर्मचाऱ्यांवर जनगणनेची जबाबदारी


बीड, 21 एप्रिल (हिं.स.)। जनगणना प्रक्रियेसाठी शहर व ग्रामीण भागात मिळून एकूण २२१ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून, या कामासाठी तालुक्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक जनगणनेस १४ मेपासून सुरुवात होणार आहे.

धारूर शहरात २६ प्रगणक तर ग्रामीण भागात १७५ प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत. संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी १७ सुपरवायझर, ३ मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनगणना प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून, प्रत्येक कुटुंबाकडून ३१ प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित करण्यात येणार आहे.

गुरुवार, २३ एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, प्रत्यक्ष जनगणना कामास १४ मेपासून सुरुवात होणार आहे. यासाठी तहसील कार्यालय, नगरपरिषदेमधील अधिकारी आणि प्रमुख कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची सविस्तर नोंद केली जाणार आहे. ग्रामपातळीवर शहरात प्रत्यक्ष कुटुंब सर्वेक्षण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना स्वतंत्र मानधन व भत्ताही देण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande