त्र्यंबकेश्वर मंदिर कोटा लगतची दुकाने हटवली; व्यवसायिकांची नाराजी
त्रंबकेश्वर , 21 एप्रिल (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर मंदिराचा कोट लगतची दुकाने आज कुंभमेळा प्रशासनाने हटवली आहे. गेलीं 70 ते 80 वर्ष ही त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या जागेत असलेले हे व्यवसायिक भाडेकरू हटविण्यात आले . सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर मंदि
Shops near Trimbakeshwar


त्रंबकेश्वर , 21 एप्रिल (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर मंदिराचा कोट लगतची दुकाने आज कुंभमेळा प्रशासनाने हटवली आहे. गेलीं 70 ते 80 वर्ष ही त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या जागेत असलेले हे व्यवसायिक भाडेकरू हटविण्यात आले . सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन पथासाठी हे व्यवसाय हटवण्यात आले. दरम्यान व्यवसायिकांनी जोरदार नाराजी व्यक्त करीत तात्काळ पुनर्वसन करून द्या अशी मागणी केली आहे. दुकानदार व प्रशासन अधिकारी यांच्यातील बैठकीत मंगळवारी सकाळी आठच्या आत दुकाने हटवली नाहीतर प्रशासन दुकाने काढेल असा अंतिम इशारा दिला होता. आज सकाळी प्रशासनाने दोन जीबीसी लावून वेगवान कारवाई करीत दुकाने हटवत जागा रिकामी केली. व्यवसायिकांचा विरोध प्रशासनासमोर गळून पडला. शिवनेरी चौक त्र्यंबकेश्वर मंदिर ते त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालय यांचे अलीकडे मध्ये असलेली अतिक्रमणे काढण्यात आली.

शासनाकडून पुनर्वसन करून देण्याचे आश्वासन व्यवसायिकांना तोंडी देण्यात आलेले आहे. त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने व नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी तथा देवस्थानचे सचिव कुंभमेळा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार यांनी यासंदर्भात पालक प्रशासनाचे भूमिका स्पष्ट केली होती. आज पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली . प्रशासनाच्या या कारवाईने तीस कुटुंबाचे उपजीविका थांबल्याचे व्यवसायिकांनी म्हटले आहे.यात

दुकानातील साहित्य माल अगोदरच व्यवसायिकांनी काढलेला होता परंतु अन्य मोठे नुकसान झाले . व्यवसायिक कमालीचे नाराज झाले. त्रंबकेश्वर मंदिराचा बाह्यभागाचा दगडी कोट दिसण्यास आता मदत होणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande