आयआरजीसी संबंधीत व्यक्तींना फिफा वर्ल्ड कपमध्ये प्रवेश नाही, ट्रम्प प्रशासनाचा इराणला इशारा
वॉशिंग्टन , 24 एप्रिल (हिं.स.)।आशियात युद्ध सुरू असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, या उन्हाळ्यात होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये इराणच्या सहभागाबाबत त्यांना कोणतीही हरकत नाही. मात्र, काही अटी आहेत आणि त्या इराणी ख
आयआरजीसी संबंधीत व्यक्तींना फिफा वर्ल्ड कपमध्ये प्रवेश नाही, ट्रम्प प्रशासनाचा इराणला इशारा


वॉशिंग्टन , 24 एप्रिल (हिं.स.)।आशियात युद्ध सुरू असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, या उन्हाळ्यात होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये इराणच्या सहभागाबाबत त्यांना कोणतीही हरकत नाही. मात्र, काही अटी आहेत आणि त्या इराणी खेळाडू तसेच अधिकाऱ्यांनी पूर्ण कराव्या लागतील. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी या अटी स्पष्टपणे मांडल्या आहेत.

याबाबत रुबिओ यांनी सांगितले की, फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या इराणी खेळाडूंना त्यांच्या सोबत अशा व्यक्तींना आणण्याची परवानगी दिली जाणार नाही, ज्यांचा इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) शी कोणताही संबंध आहे.रुबिओ म्हणाले, “अमेरिकेकडून त्यांना असे काहीही सांगण्यात आलेले नाही की ते येऊ शकत नाहीत. इराणबाबत अडचण खेळाडूंना घेऊन नाही, तर त्यांच्या सोबत येऊ इच्छिणाऱ्या काही व्यक्तींना घेऊन आहे, ज्यांपैकी काहींचे आयआरजीसी शी संबंध आहेत.”

ते पुढे म्हणाले, “कदाचित आम्ही त्यांना देशात प्रवेश देणार नाही… कदाचित ते स्वतःच न येण्याचा निर्णय घेतील. पण ते आयआरजीसी शी संबंधित लोकांचा मोठा गट आमच्या देशात आणून त्यांना पत्रकार किंवा अॅथलेटिक ट्रेनर असल्याचे दाखवू शकत नाहीत.”

अशा प्रकारे फुटबॉलच्या या जागतिक स्पर्धेत इराणच्या सहभागाबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट झाली आहे. ट्रम्प यांनीही या मुद्द्यावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आणि सांगितले की, “त्यांचे प्रशासन खेळाडूंवर कोणताही परिणाम होऊ देणार नाही.” यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे एक विशेष दूत यांनी कथितरित्या फिफा कडे आगामी वर्ल्ड कपमध्ये इराणच्या जागी इटलीला संधी देण्याची विनंती केली होती. ही स्पर्धा ११ जूनपासून सुरू होणार आहे.

एका अहवालानुसार, अमेरिकेचे विशेष दूत पाओलो झाम्पोली म्हणाले, “मी याची पुष्टी करतो की, मी ट्रम्प आणि फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांना वर्ल्ड कपमध्ये इराणच्या जागी इटलीला सामील करण्याचा सल्ला दिला आहे.” ते पुढे म्हणाले, “मी मूळचा इटलीचा रहिवासी आहे आणि अमेरिकेच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत ‘अझुरी’ (इटलीचा संघ) खेळताना पाहणे माझ्यासाठी स्वप्नवत असेल. चार विजेतेपदांसह, या स्पर्धेत सहभागी होण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.”

इराणचा पहिला सामना १६ जून रोजी सोफी स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर त्याच स्टेडियममध्ये बेल्जियमविरुद्ध सामना खेळला जाईल. त्यानंतर २६ जून रोजी सिएटल येथे मोहम्मद सलाह आणि इजिप्तविरुद्ध सामना खेळून इराण आपल्या गट फेरीतील सामने पूर्ण करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande