इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची इस्लामाबाद दौऱ्यावर
* चर्चेत अमेरिकेचा सहभाग नसल्याची माहिती इस्लामाबाद, २४ एप्रिल (हिं.स.) : इराण आणि इस्त्रायल, अमेरिका यांच्यातील संघर्षादरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची इस्लामाबाद दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. तिथे पोहोचल्यावर ते पाकिस्तानी अधिकाऱ्य
इराण परराष्ट्र मंत्री अराघची


* चर्चेत अमेरिकेचा सहभाग नसल्याची माहिती

इस्लामाबाद, २४ एप्रिल (हिं.स.) : इराण आणि इस्त्रायल, अमेरिका यांच्यातील संघर्षादरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची इस्लामाबाद दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. तिथे पोहोचल्यावर ते पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. ही बैठक अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य चर्चेची पूर्वतयारी म्हणून पाहिली जात आहे. वृत्तानुसार, या चर्चेत अमेरिकेचा सहभाग नसेल. या दौऱ्यात द्विपक्षीय मुद्दे आणि प्रादेशिक विषयांवर चर्चा केली जाईल.

त्याआधी आज, शुक्रवारी दुपारी अराघची यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक डार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी कायम ठेवण्यावर या चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले.

पाकिस्तान या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका बजावत आहे आणि आशा आहे की, या बैठकीमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीचा मार्ग मोकळा होऊ शकेल.

इराणी वृत्तसंस्थेने दिलेल्या नुसार, पाकिस्ताननंतर अराघची ओमानची राजधानी मस्कत आणि त्यानंतर रशियाला भेट देतील. दरम्यान अराघची यांनी सांगितले की, इराणसाठी आपले शेजारी देश प्राधान्यक्रमावर आहेत. पाकिस्ताननंतर ते ओमानची राजधानी मस्कत आणि रशियाची राजधानी मॉस्कोलाही भेट देतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande