युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची असिम मुनीर यांच्याशी फोनवर चर्चा
तेहरान , 24 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने पाकिस्तानसोबतची आपली राजनैतिक हालचाल वाढवली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वासोबत दूरध्वनीवर महत्त्वपूर्ण चर्चा केल
युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची असिम मुनीर यांच्याशी फोनवर चर्चा


तेहरान , 24 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने पाकिस्तानसोबतची आपली राजनैतिक हालचाल वाढवली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वासोबत दूरध्वनीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू प्रादेशिक सुरक्षा आणि अमेरिकेसोबतच्या युद्धविरामाशी संबंधित मुद्दे होते.

माहितीनुसार, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या वेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसह सध्या संपूर्ण मुस्लिम जगत आणि शेजारी देशांवर परिणाम करणाऱ्या प्रादेशिक आव्हानांवर विचारविनिमय केला.

राजनैतिक पातळीवरील चर्चेसोबतच अराघची यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशीही दूरध्वनीवर संपर्क साधला. वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि इराणचे परराष्ट्रमंत्री यांच्यात झालेल्या या चर्चेत युद्धविरामाशी संबंधित मुद्द्यांवर गंभीरपणे चर्चा करण्यात आली. इतकेच नव्हे, अब्बास अराघची यांनी केवळ पाकिस्तानपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. त्यांनी इराकच्या कुर्द प्रदेशाचे राष्ट्रपती नेचिरवान बारझानी यांच्यासोबतही स्वतंत्र दूरध्वनी संभाषण केले. इराक आणि त्याच्या कुर्द प्रदेशासोबत इराणचे संबंध नेहमीच संवेदनशील आणि महत्त्वाचे राहिले आहेत.पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इराण सध्या या प्रदेशातील महत्त्वाच्या देशांसोबत व्यापक सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तणाव आणखी वाढू नये.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande