पश्चिम आशियातील तणाव : अमेरिकेच्या नौदलाकडून 'यूएसएस बुश' युद्धनौका आखातात दाखल
वॉशिंग्टन , 24 एप्रिल (हिं.स.)। अमेरिकेने इराणसोबतचा युद्धविराम वाढवला असला तरी दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. दरम्यान, अमेरिकन सैन्याने गुरुवारी माहिती दिली की यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश हे विमानवाहू युद्धनौक पश्चिम आशियाई प्रदेशात पोहोचले आहे
पश्चिम आशियातील तणाव: अमेरिकेच्या नौदलाकडून 'यूएसएस बुश' युद्धनौक आखातात दाखल


वॉशिंग्टन , 24 एप्रिल (हिं.स.)। अमेरिकेने इराणसोबतचा युद्धविराम वाढवला असला तरी दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. दरम्यान, अमेरिकन सैन्याने गुरुवारी माहिती दिली की यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश हे विमानवाहू युद्धनौक पश्चिम आशियाई प्रदेशात पोहोचले आहे. यामुळे या भागात तैनात अमेरिकेच्या विशाल युद्धनौकांची संख्या वाढून तीन झाली आहे.

अमेरिकन सेंट्रल कमांडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की, हे विमानवाहू जहाज 23 एप्रिल रोजी हिंदी महासागरातील त्यांच्या जबाबदारीच्या क्षेत्रात कार्यरत होते. पोस्टसोबत शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रात विमानवाहू जहाजाच्या डेकवर मोठ्या संख्येने लढाऊ विमाने तैनात असल्याचे दिसत आहे.

अमेरिकन सैन्यानुसार, यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश पश्चिम आशियात दाखल झाले असून त्यामुळे या भागातील अमेरिकन युद्धनौकांची संख्या तीन झाली आहे. यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश हे अमेरिकन नौदलाचे निमिट्झ-श्रेणीतील अणुऊर्जेवर चालणारे विमानवाहू युद्धनौक आहे. या श्रेणीतील हे दहावे आणि अंतिम जहाज आहे.

याचे वजन सुमारे 1,04,000 मेट्रिक टन असून लांबी एकूण 1,092 फूट आहे. 2 ए4डब्ल्यू अणुभट्ट्यांवर चालते (इंधन न भरता 20 ते 25 वर्षे कार्यरत राहू शकते) वेग 30 नॉट्सपेक्षा अधिक आहे. या जहाजामध्ये सुमारे 3,200 जहाज कर्मचारीतर सुमारे 2,500 एअर विंग कर्मचारी आहेत. 90 पर्यंत लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांचा समावेश आहे.यामध्ये एकूण कर्मचारी संख्या: 5,000 ते 6,000 इतकी आहे.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराण कोणताही करार करत नाही तोपर्यंत अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण कायम ठेवेल. त्यांनी स्पष्ट केले की या महत्त्वाच्या तेलवाहतुकीच्या मार्गाचा दबाव निर्माण करण्यासाठी वापर केला जात आहे.ट्रम्प म्हणाले, “यावर आमचे पूर्ण नियंत्रण आहे. हा मार्ग तेव्हाच खुला होईल, जेव्हा ते एखादा करार करतील किंवा अन्य काही सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.” त्यांनी हेही स्पष्ट केले की हा मार्ग बंद ठेवण्याचा उद्देश इराणच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढवणे हा आहे. ट्रम्प म्हणाले, “जर आपण हा मार्ग खुला केला, तर इराण दररोज सुमारे 500 दशलक्ष डॉलर कमवेल. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत त्यांनी इतका पैसा कमवावा, अशी माझी इच्छा नाही.”

होर्मुझ सामुद्रधुनी हा एक अरुंद समुद्री मार्ग आहे, जो आखाती तेल उत्पादक देशांना जगातील बाजारपेठांशी जोडतो. येथे कोणताही अडथळा निर्माण झाल्यास तेलाच्या किंमतीत चढ-उतार होतात आणि पुरवठ्याबाबत चिंता वाढते. ट्रम्प यांनी मान्य केले की याचा परिणाम सामान्य नागरिकांवरही होऊ शकतो. इंधनाच्या किमतींबाबत विचारले असता ते म्हणाले, “काही काळासाठी परिणाम होईल.” मात्र त्यांनी असेही सांगितले की बाजार सध्या स्थिर आहेत.

ट्रम्प म्हणाले, “शेअर बाजार उच्चांकावर आहे. मला वाटले होते की तेलाची किंमत 200 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते, पण तसे झाले नाही आणि किंमती अपेक्षेपेक्षा खूप वेगळ्या आहेत.” प्रशासनाने सांगितले की देशातील वाढत्या उत्पादनामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. ट्रम्प म्हणाले, “सध्या आम्ही आमच्या इतिहासातील सर्वाधिक तेल आणि वायू उत्पादन करत आहोत.” ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत हा मार्ग बंद आहे, तोपर्यंत जगभरातून जहाजे टेक्सास, लुईझियाना आणि अलास्का येथे येत आहेत, जेणेकरून अमेरिकेकडून तेल घेता येईल.”

ट्रम्प यांनी या संपूर्ण दबावाचा संबंध सुरक्षेशीही जोडला. ते म्हणाले, “आम्ही त्यांना अण्वस्त्रे बाळगू देऊ शकत नाही.” त्यांनी हेही संकेत दिले की या प्रश्नाचे समाधान लवकर होणार नाही. ट्रम्प म्हणाले, “मला कोणतीही घाई नाही, आमच्याकडे भरपूर वेळ आहे.” यावरून स्पष्ट होते की तेलपुरवठा मर्यादित राहिल्याने इराणवरील दबाव आणखी वाढत जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande