सोलापुरात भाजप देणार ‘भीमज्योती’ने अपप्रचाराला उत्तर
सोलापूर, 25 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहरातील काही घटकांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या नावाने चुकीचे नरेटिव्ह पसरवले जात असल्याचा आरोप भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केला. या अपप्रचाराला ठोस उत्तर
Ksk


सोलापूर, 25 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहरातील काही घटकांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या नावाने चुकीचे नरेटिव्ह पसरवले जात असल्याचा आरोप भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केला. या अपप्रचाराला ठोस उत्तर देण्यासाठी आणि समाजात योग्य संदेश पोहोचवण्यासाठी ‘भीमज्योती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तडवळकर म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करत आला आहे. तसेच संविधानाच्या मूल्यांचे जतन आणि पालन करण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. मात्र, काही राजकीय स्वार्थी मंडळींकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

‘भीमज्योती’ उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांचे कार्य, विचार आणि संविधानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांच्या संकल्पनेतून भीमज्योत नागपूर अकोला नाशिक लातूर सोलापूर मुंबई असा प्रवास करत आहे. या कार्यक्रमातून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनाचे सामूहिक वाचन बुद्ध वंदना करण्यात येणार आहे.

त्यानंतर पुढील कार्यक्रम हेरिटेज येथे संपन्न होणार आहेत. त्यामध्ये भीम शाहिरी कार्यक्रम तसेच बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एआय चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. तमाम सोलापूरकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

समाजात ऐक्य, समता आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी पक्षनेते नरेंद्र काळे महेश बनसोडे, विश्वजीत गायकवाड, प्रवीण कांबळे, राजू माने आदींची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande