
लातूर, 25 एप्रिल, (हिं.स.)। भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी लातूर तालुक्यात विशेष ‘मॅपिंग’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत मतदार नोंदणी अधिकारी (BLO) मतदान केंद्रांवर दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उपलब्ध राहणार असून इतर वेळी ते घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत.
मतदारांनी आपले ओळखपत्र दाखवून माहितीची खातरजमा करून घ्यावी. दुबार किंवा तिबार नोंद टाळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. मॅपिंग न केल्यास भविष्यात सुनावणी व पुरावे सादर करण्याची वेळ येऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपले मॅपिंग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis