
कोल्हापूर, 25 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती ताराराणी यांच्या शौर्याला, स्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने कोल्हापूरच्या प्रस्तावित आय.टी. पार्कचे “करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी आय.टी.पार्क” असे नामकरण करावे अशी उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे आ. राजेश क्षीरसागर यांनी मागणी केली.
कोल्हापूरला आय.टी.पार्क मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचे जाहीर आभार व्यक्त केले.
कोल्हापुरात सुमारे ३४.३६ हेक्टर जागेत हे आय.टी.पार्क होत असताना भागातील युवकांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी मुंबई, बेंगलोर, पुणेच्या धर्तीवर आय.टी.हबचा दर्जा प्राप्त करून द्यावा तसेच मोठमोठ्या कंपन्यांनी याठिकाणी गुंतवणूक करावी याकरिता मित्र संस्थेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे बैठकीदरम्यान बोलताना सांगितले.
कोल्हापूरला क्रीडानगरीची ओळख अधोरेखित करण्याकरिता निर्माण केल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी उद्योग विभागाने जागा उपलब्ध केल्याबद्दल आभार आणि अभिनंदन व्यक्त केले. या ठिकाणी उच्च दर्जाचे स्टेडियम बांधकाम करून क्रीडारसिकांना आवश्यक सोयी सुविधा त्याठिकाणी उपलब्ध कराव्यात अशी मागणी देखील मा. ना. उदयजी सामंत यांच्याकडे केली.
कोल्हापुरात पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसंह इतर औद्योगिक वसाहती उपलब्ध आहेत. मोठ्या कंपन्याची याठिकाणी गुंतवणूक करावी व कोल्हापूरच्या रोजगाराला आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळावी यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, संजयगांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, समन्वयक कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, सुनील जाधव, आश्पाक आजरेकर, रिक्षासेना जिल्हाप्रमुख राजू पवार, अनिल पाटील, टिंकू देशपांडे, कृष्णा लोंढे, अंकुश निपाणीकर, सौरभ कुलकर्णी, देवेंद्र खराडे, सचिन भोळे, किरण अतिग्रे, अर्जुन संकपाळ, मुन्ना तोरस्कर, आदर्श जाधव आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar