परभणीत अबकड वर्गीकरणाचा निषेध, आंदोलनाचा इशारा
परभणी, 25 एप्रिल (हिं.स.)। अनुसूचित जातींच्या अ, ब, क, ड वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात परभणीत आक्रमक भूमिका घेण्यात आली. यासंबधी शनिवारी(दि. २५)विविध समाजघटकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्य सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.बैठक
परभणीत अबकड वर्गीकरणाचा निषेध, आंदोलनाचा इशारा


परभणी, 25 एप्रिल (हिं.स.)।

अनुसूचित जातींच्या अ, ब, क, ड वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात परभणीत आक्रमक भूमिका घेण्यात आली. यासंबधी शनिवारी(दि. २५)विविध समाजघटकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्य सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते डी. एन. दाभाडे हे होते. ते म्हणाले, आरक्षणावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. यावेळी भंते मुदितानंद, डॉ. भगवान धुतमल, जयप्रकाश इंगोले, रामकिशन कांबळे, पंडित टोमके, डॉ. डी. आर. तुपसमुंदरे आदींची उपस्थिती होती. या बैठकीत ‘अ, ब, क, ड’ वर्गीकरणाच्या प्रस्तावावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तसेच हे वर्गीकरण म्हणजे संविधानिक हक्कांवर थेट घाला असून समाजात फूट पाडण्याचा धोकादायक प्रयत्न असल्याचा ठराव बहुमताने संमत करत मागासवर्गीय जातींमधील ‘अ, ब, क, ड’ आरक्षण वर्गीकरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याविषयी राज्य सरकारने आक्षेप नोंदवण्यासाठी दिलेला कालावधी अत्यंत अपुरा असल्याचे सांगत तो तात्काळ वाढवण्याची मागणीही करण्यात आली. बैठकीत मंगळवारी(दि. २८) परभणीत तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande