दुर्योधनाबरोबर राहणारे संजय राऊत हे दु:शासन तर राघव पांडवांसोबतच - नवनाथ बन
मुंबई, 25 एप्रिल, (हिं.स.)। भाजपाचा उल्लेख बकासुर असा करत जनाब संजय राऊत महाभारतात गेलेच आहेत तर त्यांना इतकेच सांगायचेय की तुम्ही दुर्योधनाबरोबर आहात आणि स्वतः दु:शासनाच्या भूमिकेत आहात. महाभारतातील दु:शासनाप्रमाणे तुम्ही वागत आहात. ज्यांचे नाव रा
मुंबई


मुंबई, 25 एप्रिल, (हिं.स.)। भाजपाचा उल्लेख बकासुर असा करत जनाब संजय राऊत महाभारतात गेलेच आहेत तर त्यांना इतकेच सांगायचेय की तुम्ही दुर्योधनाबरोबर आहात आणि स्वतः दु:शासनाच्या भूमिकेत आहात. महाभारतातील दु:शासनाप्रमाणे तुम्ही वागत आहात. ज्यांचे नाव राघव आहे ते दुर्योधन आणि दु:शासनासोबत नव्हे तर ते पांडवासोबतच राहतील. राहुल गांधींसारख्या दु:शासनासोबत किंवा अहंकारी अरविंद केजरीवालसोबत राहण्यापेक्षा राघव चढ्ढा यांच्यासह सात खासदारांनी भाजपात राहणे पसंत केले. ज्यांच्यासोबत धर्म आहे त्यांच्यासोबत पांडव असतात. दु:शासन होऊन कशा पद्धतीने आपण महिलांवर टीका करतो आणि पाटकर नावाच्या भगिनीचा छळ केला एकदा जनतेला सांगा, अशा शब्दात शनिवारी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रहार केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते.

राघव चढ्ढा आणि इतर सहा खासदार आम आदमी पार्टीसोबत, इंडिया आघाडीसोबत होते तेव्हा ते सेलिब्रिटी होते, जनमानसातले नेते होते आणि तेच भाजपासोबत आले की मग पेज थ्रीचे नेते, त्यांना जनतेत काही किंमत नाही असे म्हणायचे. एकनाथजी शिंदे तुमच्यासोबत होते तेव्हा ते आनंद दिघे यांचे विचार चालवायचे. त्याच एकनाथजी शिंदे यांनी मूळ विचार घेऊन आपली शिवसेना सुरू केली तेव्हा त्यांना काय काय शिव्या दिल्या हे महाराष्ट्राने पाहिले. गद्दार म्हणून उल्लेख केला. हिंदुत्वादाशी गद्दारी करणारे संजय राऊत आहेत. राघव चढ्ढा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अहंकाराला आणि इंडिया आघाडीच्या महिलाविरोधी धोरणाला कंटाळून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे बन म्हणाले.

संजय राऊत, तुम्ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले म्हणून, संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला म्हणून किंवा महाराष्ट्रात काहीतरी क्रांती झाली पाहिजे म्हणून तुरुंगात गेला नव्हता तर मराठी माणसांची घरे लुटली, पत्राचाळीत मराठी माणसांना बेघर करून स्वतःचे खिशे भरले म्हणून तुम्हाला तुरुंगवारी झाली. भाजपा दबावाचे राजकारण करत नाही. दबावापोटी भाजपात प्रवेश करायला लागले असते तर संजय राऊत सगळ्यात आधी तुमचा प्रवेश भाजपात झाला असता, असे बन यांनी सुनावले.

बन पुढे म्हणाले, निवडणूक आयोग नेमका कुठला डबा आहे हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. जनतेने तुम्हाला डस्टबिन म्हणून वापरले. उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी तुम्हाला डस्टबिन म्हणून वापरतात. कधी कधी राहुल गांधी तुम्हाला डस्टबिन म्हणून वापरतात याचा विचार करा. महाराष्ट्रामध्ये उबाठा गट डबा झालाय. कोणीही वापरतो आणि फेकून देतो अशी अवस्था संजय राऊत तुमची झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावर टीका करणे हे सोडून द्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande