मतदारांच्या पाठिंब्याची लाट; उमेश गावंड यांचा विजय निश्चित?
रायगड, 26 एप्रिल (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील खारेपाठ विभागातील वैजाली ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना युतीच्या वतीने उमेदवार उमेश गावंड या
**उमेश गावंड यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद; विजयाची चिन्हे स्पष्ट**  *अँड. रत्नाकर पाटील, अलिबाग :* अलिबाग तालुक्यातील खारेपाठ विभागातील वैजाली ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना युतीच्या वतीने उमेदवार उमेश गावंड यांच्या प्रचाराला वेग आला असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.  उमेश गावंड यांनी घरभेटींद्वारे मतदारांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या साध्या, मनमिळाऊ स्वभावामुळे आणि समाजकार्याच्या पार्श्वभूमीमुळे मतदार त्यांच्याशी आपलेपणाने जोडले जात असल्याचे चित्र आहे. गावातील विविध वाड्यांमध्ये भेटी देत त्यांनी विकासकामांबाबत आपले नियोजन मतदारांसमोर मांडले.  जिल्हा परिषद सदस्य अमितदादा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. हाशिवरे परिसरात भेट देत त्यांनी मतदारांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच मिळालेला प्रतिसाद पाहता गावंड यांची आघाडी ठळकपणे दिसून येत आहे.  वैजाली ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी 28 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात होणार असून 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात उत्सुकता वाढली आहे.  उमेश गावंड हे तरुण, ऊर्जावान आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी निगडित राहणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असून तरुणांमध्ये त्यांचे विशेष स्थान आहे. वडीलधाऱ्यांचा सन्मान राखत त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतल्याने त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.  सुनील पाटील, अल्पशा पाटील, अमोल ठाकूर, मंगेश ठाकूर, निलेश ठाकूर, किरण मोकल, प्रदीप ठाकूर, प्रीतीश गावंड, एकलव्य प्रविण अंबाडे, साहिल पाटील, विघ्नेश पाटील, पियुष पाटील, प्रमोद गावंड, सुवेद मोकल, रीना गावंड, जय ठाकूर, राजश्री पाटील, लीला मोकल, जागृती म्हात्रे, प्रिती गावंड, अलका मोकल, किरण घरत आदी कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारात सक्रिय आहेत. घरोघरी भेट देत मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे.  एकूणच, मतदारांकडून मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता उमेश गावंड यांच्या विजयाची चिन्हे स्पष्ट होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


रायगड, 26 एप्रिल (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील खारेपाठ विभागातील वैजाली ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना युतीच्या वतीने उमेदवार उमेश गावंड यांच्या प्रचाराला वेग आला असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

उमेश गावंड यांनी घरभेटींद्वारे मतदारांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या साध्या, मनमिळाऊ स्वभावामुळे आणि समाजकार्याच्या पार्श्वभूमीमुळे मतदार त्यांच्याशी आपलेपणाने जोडले जात असल्याचे चित्र आहे. गावातील विविध वाड्यांमध्ये भेटी देत त्यांनी विकासकामांबाबत आपले नियोजन मतदारांसमोर मांडले.

जिल्हा परिषद सदस्य अमितदादा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत. हाशिवरे परिसरात भेट देत त्यांनी मतदारांशी संवाद साधून मतदानाचे आवाहन केले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच मिळालेला प्रतिसाद पाहता गावंड यांची आघाडी ठळकपणे दिसून येत आहे.

वैजाली ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी 28 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात होणार असून 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात उत्सुकता वाढली आहे.

उमेश गावंड हे तरुण, ऊर्जावान आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी निगडित राहणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असून तरुणांमध्ये त्यांचे विशेष स्थान आहे. वडीलधाऱ्यांचा सन्मान राखत त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतल्याने त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

अनेक कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारात सक्रिय आहेत. घरोघरी भेट देत मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे.

एकूणच, मतदारांकडून मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता उमेश गावंड यांच्या विजयाची चिन्हे स्पष्ट होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande