लातूर जिल्ह्यातील 'नीट' परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर, 29 एप्रिल (हिं.स.)। : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत आयोजित ''नीट युजी'' परीक्षा येत्या ३ मे, २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत लातूर जिल्ह्यातील लातूर आणि निलंगा तालुक्यातील एकूण ३४ उपकेंद्रांवर पार पडणार असून, या परीक्षा कालावधीत केंद्रां
नीट परीक्षा


लातूर, 29 एप्रिल (हिं.स.)। : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत आयोजित 'नीट युजी' परीक्षा येत्या ३ मे, २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत लातूर जिल्ह्यातील लातूर आणि निलंगा तालुक्यातील एकूण ३४ उपकेंद्रांवर पार पडणार असून, या परीक्षा कालावधीत केंद्रांच्या परिसरात होणारी संभाव्य गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेवून जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित जमण्यास, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक ही माध्यमे ३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल किंवा इतर कोणत्याही प्रसार माध्यमांसह प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून, कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीला किंवा वाहनाला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, जेणेकरून परीक्षा अत्यंत शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडेल. हा आदेश परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी, निगराणी करणारे पथक आणि पोलीस अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयीन कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाही, मात्र इतर सर्व नागरिकांनी या प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande