पिंपरखेडच्या आगीत नुकसान झालेल्या व्यावसायिकांना आर्थिक मदत
बीड, 03 एप्रिल (हिं.स.) : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत चार व्यावसायिकांचे सुमारे १३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. या संकटग्रस्त आणि होतकरू व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍ
पिंपरखेडच्या आगीत नुकसान झालेल्या व्यावसायिकांना आर्थिक मदत


बीड, 03 एप्रिल (हिं.स.) : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत चार व्यावसायिकांचे सुमारे १३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. या संकटग्रस्त आणि होतकरू व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. आनंद काळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आर्थिक मदत केली.

या आगीत बळीराम इंगळे यांचे कापड दुकान व टेलरिंग, प्रकाश गायकवाड यांचे हॉटेल तसेच अनंत काळे व अतुल कानडे यांचे ऑनलाइन मल्टी सर्व्हिस दुकान जळून खाक झाले होते. हे सर्व व्यावसायिक बँका आणि खासगी कर्ज घेऊन आपला व्यवसाय उभा करत होते. संकटाच्या वेळी ऍड. आनंद काळे धावून आले आणि आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, जिल्हा परिषद सदस्य औदुंबर सावंत, चेअरमन श्रीनिवास निपटे, बाळासाहेब घुमरे, वृक्षराज निपटे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ऍड. काळे यांनी सांगितले की, पिंपरखेड येथील तरुण व्यावसायिकांवर अचानक संकट आले आहे. त्यांनी खचून न जाता पुन्हा उभारी घ्यावी, यासाठी मी खारीचा वाटा म्हणून अल्प आर्थिक मदत केली आहे. इतर दानशूर व्यक्तींनीही या तरुणांना सहकार्य करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande