
बीड, 03 एप्रिल (हिं.स.)।
अंबाजोगाई-अहमदपूर मार्गावरील बसमध्ये घाटनांदूरजवळ एका महिला वाहकाने प्रवासी महिलेचा चावा घेतल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी महिला वाहकाने परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील महिला आपल्या नातवाला उपचारासाठी घाटनांदूर येथे घेऊन जात होत्या. त्यावेळी बसमधील वाहक महिलेसोबत त्यांचा वाद झाला. या वादावेळी महिला वाहकाने प्रवासी महिलेच्या हाताचा चावा घेतल्याचा आरोप प्रवासी महिला यांनी केला आहे. याचवेळी गळ्यातील पोतही गायब झाल्याची तक्रार त्यांनी केली आहे. प्रवासी महिलेने परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात येत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी त्यांना उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. प्रत्यक्षात वाहक महिलेने चावा घेतला का, प्रवासी महिलेचा आरोप कितपत खरा आहे, याचा तपास परळी ग्रामीण पोलिस करत आहेत.
महिला प्रवासी बसमधून उतरून घाटनांदूरच्या पोलिस चौकीमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. परंतु, तेथून तिला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis