परभणीत विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात
परभणी, 03 एप्रिल, (हिं.स.)। येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदान परिसरात छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ३
परभणीत विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात


परभणी, 03 एप्रिल, (हिं.स.)। येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदान परिसरात छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ३) सकाळी उत्साहात पार पडले.

या स्पर्धेमुळे विभागातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये क्रीडाभावना, सांस्कृतिक जाणीव आणि एकात्मता वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. उद्घाटनानंतर विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला.

उद्घाटन समारंभास परभणीचे महापौर सय्यद इकबाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लताताई वाकळे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कडिंले, जालनाच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती पुजार, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, वनामकृ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि, मनपा आयुक्त नितीन नॉर्वेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्यासह विभागातील विविध खेळांचे खेळाडू, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सहभागी खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande