अक्कलकोटमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानाचे आयोजन
सोलापूर, 03 एप्रिल (हिं.स.) : अक्कलकोट विधानसभा क्षेत्राच्या वतीने पद्मावती मंगल कार्यालय येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ चे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी आणि सोलापूर
Jdjd


सोलापूर, 03 एप्रिल (हिं.स.) : अक्कलकोट विधानसभा क्षेत्राच्या वतीने पद्मावती मंगल कार्यालय येथे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ चे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी आणि सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारेचे महत्त्व अधोरेखित करत संघटन मजबूत करण्यासाठी आणि समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षण अभियानाद्वारे कार्यकर्त्यांना संघटनात्मक कौशल्ये, जनसंपर्क वाढविण्याच्या पद्धती तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

या प्रसंगी युवा मोर्चाचे प्रदीप पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, महेश बिराजदार, विकास वाघमारे, गुरुशांत धुत्तरगावंकर यांच्यासह अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील मंडल अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेचे सदस्य आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले असून, उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande