हर्षवर्धन खरातच्या चौकशीत हवाला रॅकेटचा प्रबळ संशय
नाशिक, 03 एप्रिल (हिं.स.) : एसआयटीने अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. अशोक खरातच्या मुलाने सुरुवातीला मौन बाळगले होते. मात्र प्रश्नांची सरबत्ती त्यावर त्याने धक्कादायक माहिती दिली. त्यामुळे खरातचा मुलगा त्याचा विर
हर्षवर्धन खरातच्या चौकशीत हवाला रॅकेटचा प्रबळ संशय


नाशिक, 03 एप्रिल (हिं.स.) : एसआयटीने अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. अशोक खरातच्या मुलाने सुरुवातीला मौन बाळगले होते. मात्र प्रश्नांची सरबत्ती त्यावर त्याने धक्कादायक माहिती दिली. त्यामुळे खरातचा मुलगा त्याचा विरोधात मोठा पुरावा झालेला आहे.

महिलांची लैंगिक शोषण फसवणूक या सर्व प्रकरणांमध्ये सध्या 18 मार्चपासून पोलिसांच्या ताब्यामध्ये असलेला भोंदू गिरी करणारा अशोक खरात याचे वेगवेगळे कारणामे सातत्याने समोर येत आहे आत्तापर्यंत तिच्यावरती लैंगिक शोषण फसवणूक या स्वरूपाचे एकूण 11 गुन्हे दाखल झालेले आहेत यामधील काही गुन्हे नाशिक शहरात तर काही गुन्हे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत शिर्डी पोलीसही दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करत आहेत. नुकताच अलीकडच्या काळामध्ये खरात वर शिर्डीमध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये स्वतः तो तिची बायको आणि इतर तिघांचा समावेश होता पोलिसांनी इतर तिघांना अटक केली पण त्याची बायको कल्पना हिला अटक करण्यासाठी गेले असताना ती फरार झाल्याचे समोर आले त्यामुळे त्याचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले त्याच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

त्यामध्येच पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन ने सांगितले की आमच्या घरात मोठ्या प्रमाणावर कॅश यायची. हे पैसे कुठून आणि न येत होते, याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्याचे सर्व नियंत्रण डॅडी अशोक खरात यांच्याकडे होते. त्यांना प्रत्येक व्यवहाराची इत्यंभूत माहिती होती, अशी कबुली अशोक खरातच्या मुलाने दिली आहे. यावरून खरातच्या घरात पैशांचा महापूर वाहत होता आणि त्यामागे मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट होत आहे. मुलाने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना आता हवाला रॅकेटचा प्रबळ संशय आहे. यासाठी ईशान्यश्वर मंदिराच्या शिवनिका संस्थान मधील तीन संचालकांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान हर्षवर्धन खरात यांनी दिलेली ही कबुली म्हणजे लंपट असलेल्या अशोक खरात च्या विरोधात मोठा पुरावा पोलिसांना मिळाला आहे पोलिसाचा त्याचा वापर करून मनी लँडिंग च्या प्रकरणांमध्ये देखील कारवाई करू शकतात असा अंदाज पोलीस खात्यातील तज्ञ मंडळी व्यक्त करीत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande