
चंद्रपूर, 30 एप्रिल, (हिं.स.)। जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपुरच्या वतीने जिल्ह्यातील उदोन्मुख खेळाडूंना अद्यावत व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याकरिता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पहिल्या टप्प्यात 2 ते 11 मे पर्यंत तर दुसरा टप्पा 12 ते 21 मे 2026 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा स्टेडीयम, चंद्रपूर येथे सकाळी व सायंकाळी शिबिराचे आयोजन करण्यात येणार यात व्हॉलीबॉल व बॉक्सिंग, जलतरण, कराटे, बास्केटबॉल, बॅडमिंटन, वुशु या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण, सोबतच खेळाडुंना कौशल्य विकासाचे धडे, समुपदेशन, चर्चासत्र, परिसंवाद तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून देण्यात येईल. सदर प्रशिक्षण शिबिरात 12 वर्षावरील ते 19 वर्षाखालील सर्व मुलामुलींना सहभाग घेता येईल.
शिबिरात भाग घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव