परभणी जिल्ह्यासाठी 72 हजार लिटर केरोसीन मंजूर
परभणी, 06 एप्रिल (हिं.स.) : जागतिक स्तरावरील भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी परभणी जिल्ह्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, 72 हजार लिट
परभणी जिल्ह्यासाठी 72 हजार लिटर केरोसीन मंजूर


परभणी, 06 एप्रिल (हिं.स.) : जागतिक स्तरावरील भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी परभणी जिल्ह्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, 72 हजार लिटर (72 कि.ली.) केरोसीन मंजूर केले आहे.

याअन्वये, रेशन कार्डधारकांना आता प्रति कुटुंब 3 लिटर केरोसीन मिळणार आहे. जिल्ह्यासाठी मंजूर केरोसीनचे नियतन करण्यासाठी 12 कि.ली. क्षमतेचे 6 टँकर्स नियोजित करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांना गॅस टंचाईमुळे अडचणी येत आहेत, त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

वितरणात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब रेशनकार्डधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. नंतर उपलब्धतेनुसार शुभ्र शिधापत्रिकाधारक आणि रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांनाही ग्रामपंचायतीच्या ‘रहिवासी दाखला’ किंवा स्थलांतरित मजूर असल्यास केंद्र/राज्य शासनाचे ओळखपत्र दाखवून 3 लिटर केरोसीन घेता येईल.

जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी नागरिकांना जवळच्या धान्य दुकानाशी संपर्क साधून आपली मागणी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. तसेच, केरोसीनचा वापर केवळ घरगुती इंधनासाठी करण्याचा इशारा देण्यात आला असून, पेट्रोल किंवा डिझेलमध्ये भेसळ केल्यास ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955’ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande