रत्नागिरी : खेडमध्ये भाजपाचा स्थापना दिवस उत्साहात
रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला आज ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.भाजपाचा
रत्नागिरी :  खेडमध्ये भाजपाचा स्थापना दिवस उत्साहात


रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला आज ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.भाजपाचा ध्वज फडकावून, पेढे वाटप व दुचाकी मिरवणूक काढून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत यावेळी स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र ऊर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अॅड. मिलिंद ऊर्फ दादू नांदगावकर, वैजेश सागवेकर, पांडुरंग पाष्टे, भाजपा अल्पसंख्यांक सेल खेड शहर अध्यक्ष नईम चौगुले, प्रीती चिखले, भरत कार्ले, मृत्युंजय मोडक, राहुल प्रभू, विजय पवार, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विजय गुप्ता, प्रदीप भोसले, प्रशांत बारटक्के, ओवैस चौगुले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande