सीएचओएस कर्मचाऱ्यांच्या मानधन रचनेत बदल
धनंजय महाडिक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे निवेदन दिले कोल्हापूर, 06 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सीएचओएस (Community Health Officers) कर्मचार्यांच्या मानधन रचनेत सुधारणा करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी कें
खा. धनंजय महाडिक आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदन देताना


धनंजय महाडिक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे निवेदन दिले

कोल्हापूर, 06 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सीएचओएस (Community Health Officers) कर्मचार्यांच्या मानधन रचनेत सुधारणा करण्याची मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांना निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या सीएचओएस कर्मचारी, जे डॉक्टर आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत आहेत, त्यांना दरमहा ४० हजार रुपये मानधन दिले जाते, ज्यामध्ये २५ हजार रुपये निश्चित वेतन आणि १५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता असतो. मात्र, नव्या प्रस्तावानुसार ही रचना बदलून ३५ हजार रुपये निश्चित वेतन आणि ५ हजार रुपये कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता अशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

खासदार महाडिक यांनी म्हटले की, या बदलामुळे ग्रामीण भागात सेवा देणार्या आरोग्य कर्मचार्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांचा कार्यप्रभाव वाढेल. महाराष्ट्र शासनाने या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेतली असून, पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचारी ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. माता आणि बाल आरोग्य, आजारांचे स्क्रीनिंग आणि जनजागृतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून या कर्मचार्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक लक्ष देण्याची विनंती खासदार महाडिक यांनी केली आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande