मालेगावमध्ये विद्यार्थी संघटना आक्रमक; डॉ. गोसावींच्या राजीनाम्याची मागणी
मालेगाव, 06 एप्रिल (हिं.स.) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक घडीत झालेली मोठी घसरण आणि राष्ट्रीय रँकिंगमध्ये आलेली मोठी घसरण यामुळे विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी मालेगाव येथे तीव्र आंदोलन केले. विद्यार्थी कृति समिती मा
मालेगावमध्ये विद्यार्थी संघटना आक्रमक; डॉ. गोसावींच्या राजीनाम्याची मागणी


मालेगाव, 06 एप्रिल (हिं.स.) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक घडीत झालेली मोठी घसरण आणि राष्ट्रीय रँकिंगमध्ये आलेली मोठी घसरण यामुळे विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी मालेगाव येथे तीव्र आंदोलन केले.

विद्यार्थी कृति समिती मालेगाव व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या वेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. कुलगुरूंनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.

भाजप, युवा सेना, ABVP, मनविसे, मराठा महासंघ, शिवजयंती मध्यवर्ती उत्सव समिती, मालेगाव विधायक समिती, मातामठ तालीम संघ यांसह विविध संस्था व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

द्वारसभेत जितू देसले, निखिल पवार, भरत पाटील, दादाजी जाधव, जगदीश खैरनार यांनी भाषणे केली.

विद्यापीठाची गेल्या दोन-तीन वर्षांत मोठी अधोगती झाली असून, प्रवेश, परीक्षा आणि निकाल या तिन्ही आघाड्यांवर प्रशासन अपयशी ठरले आहे. विद्यापीठातील महत्त्वाची पदे दीर्घकाळ ‘प्रभारी’ ठेवण्यात आल्यामुळे निर्णय प्रक्रियेत अडथळे येत आहेत. या कार्यकाळात विद्यापीठाचे राष्ट्रीय रँकिंग १७व्या स्थानावरून थेट ९१ व्या क्रमांकावर घसरल्याची नोंद आहे.

विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले की, “विद्यार्थी हिताकडे लक्ष न देता कुलगुरू गलिच्छ राजकारण करत आहेत. विद्यापीठातील अनैतिक कृत्यांसाठी पदावर राहण्याचा त्यांचा अधिकार नाही. विद्यापीठाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या डॉ. गोसावी यांचा राजीनामा मिळेपर्यंत लढा सुरू राहील.”

या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये भाजपचे निलेश कचवे, देवा पाटील, दादा जाधव, भरत पाटील, दत्ता चौधरी, निखिल पवार, आर डी निकम, मनीष पाटील, विकी पाटील, संदीप चव्हाण, निखिल बुरड, श्याम गवळी, कपिल परदेशी, संजय बापट, लतीकेश सोनवणे, सुधीर भाऊ जाधव, किशोर जाधव, क्रांती पाटील, दीपक पवार, जितू बापू देसले, संजय पवार, अमोल चौधरी, दीपक सावळे, धीरज पवार, अमित गायकवाड, प्रथमेश वैद्य, चेतन असरी, रुपेश नवगजा, राजू तात्या गायकवाड आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

याशिवाय, विद्यार्थी हितासाठी झटणाऱ्या सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य सागर वैद्य यांच्या कुटुंबाची सोशल मीडियावर जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप अभाविपने केला. याबाबतच्या ब्लॅकमेलिंग व गलिच्छ राजकारणाविरुद्ध परिषदेने वैद्य यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande