सेवाभिमुख राजकारण हीच भाजपची ओळख - पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली , 06 एप्रिल (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समर्पण आणि बलिदानाला अभिवादन केले. त्यांनी सांगितले की, पक्ष मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रसेवा करण्यासाठी भाजप कार्यकर्त्या
सेवाभिमुख राजकारण हीच भाजपची ओळख- पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली , 06 एप्रिल (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समर्पण आणि बलिदानाला अभिवादन केले. त्यांनी सांगितले की, पक्ष मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रसेवा करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या काळातील तसेच काँग्रेसच्या सत्ताकाळातील दडपशाहीपासून ते पश्चिम बंगालसारख्या राज्यांतील राजकीय हिंसेपर्यंत अनेक कठीण परिस्थितींना सामोरे गेले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “देश जाणतो की प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजप प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि पुढेही करत राहील. यापूर्वीही सकारात्मक परिणाम मिळाले आहेत आणि पुढेही मिळतील.” त्यांनी पुढे सांगितले की, “ब्रिटिशकालीन शेकडो काळे कायदे रद्द करणे, लोकशाहीसाठी नवीन संसद भवनाचे निर्माण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण, कायदा करून तीन तलाक प्रथेवर बंदी, सीएएची अंमलबजावणी, अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम — अशी अनेक कामे भाजपच्या प्रामाणिक प्रयत्नांचे परिणाम आहेत.”

त्यांनी स्पष्ट केले की पक्षाचे मिशन अद्याप सुरूच आहे. समान नागरी संहिता आणि ‘एक देश – एक निवडणूक’ यांसारख्या विषयांवर आज देशभर गंभीर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.ते म्हणाले, “भाजप कार्यकर्ते जनतेशी संबंधित प्रश्न मांडण्यात कधीही मागे हटत नाहीत. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे भारताचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना केला — मग ती आणीबाणी असो किंवा काँग्रेसच्या सत्ताकाळातील दडपशाही. अनेक कार्यकर्त्यांनी तर आपले जीवनही बलिदान केले. पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये हिंसा ही राजकीय संस्कृती बनल्याचे आपण पाहिले आहे.”

राजकीय संघर्षाच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले, “१९८४ चा तो काळ आपण विसरू शकत नाही, जेव्हा काँग्रेसने विक्रमी जागा जिंकल्या होत्या. पण भारताने हेही पाहिले की लोकांची कशी फसवणूक झाली. त्यामुळे लोकांचा विश्वास भाजपवर वाढत गेला आणि हळूहळू आम्ही जागा जिंकण्यास सुरुवात केली.”भारताच्या राजकीय प्रवाहाला आकार देणाऱ्या वैचारिक फरकांवर भर देत ते म्हणाले, “त्या काळात दोन विचारधारा समोर आल्या — एक सत्ताकेंद्रित राजकारणाची आणि दुसरी सेवाभिमुख राजकारणाची.”

पंतप्रधान मोदी यांनी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) मिळालेल्या प्रेरणेवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आरएसएसच्या विशाल आणि पवित्र वटवृक्षाच्या छायेखाली आम्हाला शुद्ध हेतू आणि प्रामाणिकतेने राजकारणात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली. सुरुवातीच्या काही दशकांत आम्ही संघटनासाठी धोरणे तयार करण्यासाठी आपली ऊर्जा समर्पित केली. त्यानंतर भाजपने स्वतःला एक मजबूत कॅडर-आधारित पक्ष म्हणून उभारण्यासाठी पूर्ण ताकद लावली.”ते पुढे म्हणाले, “आम्ही सेवाभावाने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे विशाल जाळे उभे केले, ज्यांनी पक्षाच्या तत्त्वांना आपल्या जीवनाचा आदर्श मानले आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande