
मुंबई, 08 एप्रिल (हिं.स.)। भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा आणि तटस्थ भूमिकेचा निर्णय हा जागतिक अनिश्चिततेच्या काळात धोरणात्मक स्थैर्याला बळकटी देणारा असल्याचे मत देव अॅक्सेलरेटर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उमेश उत्तमचंदानी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की,व्यवस्थापित कार्यालय क्षेत्रासाठी या स्थिर दराच्या वातावरणामुळे दृश्यमानता वाढते आणि उद्योगांना अधिक आत्मविश्वासाने दीर्घकालीन ऑक्युपन्सी म्हणजेच कंपनीने कार्यालयीन जागेबाबत घेतलेले निर्णय घेण्यास सक्षम करते.
उत्तमचंदानी यांच्या मते, भारत जीसीसीसाठी प्राधान्याने पसंतीचे स्थळ म्हणून पुढे येत असताना आम्हाला केवळ मेट्रो शहरांमध्येच नव्हे तर टियर 2 आणि टियर 3 बाजारपेठांमध्येही सातत्यपूर्ण गती दिसून येत आहे. भारताच्या मजबूत वाढीच्या दृष्टीकोनाच्या जोडीला स्थिर कर्जखर्च यामुळे जागतिक उद्योगांना त्यांच्या विस्ताराच्या योजना वेगाने पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
ते पुढे म्हणाले की, कंपन्या प्रस्थापित तसेच उदयोन्मुख व्यावसायिक केंद्रांमध्ये लवचिकता, खर्च कार्यक्षमता आणि जलद बाजारपेठ प्रवेशाला अधिक प्राधान्य देत असल्याने आमचा विश्वास आहे की या धोरणातील सातत्यामुळे लवचिक आणि व्यवस्थापित कार्यक्षेत्रांसाठीची मागणी आणखी बळकट होईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule