
मुंबई, 09 एप्रिल (हिं.स.) - प्रवाशांच्या उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि मडगाव दरम्यान धावतील.
गाडीचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसी विशेष – एकूण ४ सेवा
गाडी क्र. ०११२९ (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव वातानुकूलित विशेष) ही गाडी दिनांक १०.०४.२०२६ व १४.०४.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल व मडगाव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११३० (मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वातानुकूलित विशेष) ही गाडी मडगाव येथून दिनांक १०.०४.२०२६ व १४.०४.२०२६ रोजी १६.०० वाजता सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.
संरचना: १८ वातानुकूलित ३- टायर इकॉनॉमी डबे व २ जनरेटर व्हॅन
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी