मरेची मुंबई आणि धनबाद दरम्यान नवीन साप्ताहिक सेवा सुरू
मुंबई, ९ एप्रिल (हिं.स.) : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि धनबाद यांच्या दरम्यान नवीन साप्ताहिक सेवा सुरू केली आहे. तपशील खालीलप्रमाणे : लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -धनबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्त
मरेची मुंबई आणि धनबाद दरम्यान नवीन साप्ताहिक सेवा सुरू


मुंबई, ९ एप्रिल (हिं.स.) : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि धनबाद यांच्या दरम्यान नवीन साप्ताहिक सेवा सुरू केली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -धनबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक 13380 लोकमान्य टिळक टर्मिनस - धनबाद साप्ताहिक एक्सप्रेस, (पुढील सूचनेपर्यंत) दर बुधवारी दिनांक ०८-०४-२०२६ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १६:५५ वाजता सुटेल आणि धनबाद येथे तिसऱ्या दिवशी ०८.०० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 13379 धनबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक) ही गाडी दर सोमवारी धनबाद येथून २३.०० वाजता सुटेल (ही सेवा ०६.०४.२०२६ रोजी सुरू झाली असून, पुढील सूचना मिळेपर्यंत ती सुरू राहील) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी १३.४० वाजता पोहोचेल.

थांबे : कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी दक्षिण, खन्ना बन्जारी, ब्योहारी, बरगवॉं, सिंगरौली, ओबरा डैम, रेणुकूट, गढवा रोड जंक्शन, डालटनगंज, लातेहार, खलारी, पतरातू, रांची रोड, बोकारो थर्मल, चन्द्रपूरा आणि कतरासगढ

संरचना : २ वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित तृतीय, ६ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ जनरेटर व्हॅन.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande