रेनापुर फाट्याजवळ केजच्या तहसीलदारांचा अपघाती मृत्यू
लातूर, 09 एप्रिल (हिं.स.)। केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवार, 9 एप्रिल रोजी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गिड्डे हे MH 10 DQ 9
अपघात


लातूर, 09 एप्रिल (हिं.स.)।

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवार, 9 एप्रिल रोजी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गिड्डे हे MH 10 DQ 9895 या स्वतःच्या कारने प्रवास करत असताना वाहनाचा ताबा सुटल्याने कार पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी ते वाहनात एकटेच असल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या आकस्मिक निधनाने महसूल विभागासह संपूर्ण केज तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande